सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात परप्रांतीय कामगाराचे उपचारादरम्यान निधन…

2

सावंतवाडी ता.३१: येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगाराचे उपचार सुरू असतानाच निधन झाले.ही घटना आज दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास घडली.सटवाजी मल्लप्पा हावसेकर (६०) रा बेळगाव असे त्याचे नाव आहे.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित मयत गेली काही वर्षे आपल्या परिवारापासून दूर,येथील सबनिसवाडा परिसरात भाड्याच्या खोलीत एकटेच वास्तव्यास होते.तर मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते.दरम्यान आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.याबाबतची खबर त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.

1

4