खासदार राऊत यांची कन्या रुची राऊत हिने मतिमंद विद्यार्थ्यां समवेत साजरा केला वाढदिवस

2

सावंतवाडी,ता.३१ : रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी कन्या रुची राऊत हिने आपला वाढदिवस तालुक्यातील माऊली मतिमंद विद्यालय आरोस मधील मतिमंद विद्यार्थ्यां समवेत साजरा केला.
आपल्या अवतीभवती अनेक अशा संस्था आहेत की ज्या समाजासाठी काम करतात समाजातील दिव्यांगासाठी काम करतात आणि ते काम करत असताना त्यांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही मदत मिळू शकेल त्यांच्यात आपण वाढदिवस साजरा करून त्यांचा आणि आपला आनंद द्विगुणित होईल या सद्हेतूने आपण माऊली मतिमंद विद्यालय आरोस येथील मुलांसमवेत मुलांच्या गुणांना वाव देत त्यांचे कौतुक करत वाढदिवस साजरा केला असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांची सुकन्या रुची राऊत यांनी व्यक्त केली.
वडील खासदार विनायक राऊत यांचा सामाजिक वारसा यानिमित्ताने पुढे चालविण्याचा तिचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा असल्याची प्रतिक्रिया विद्यालयाच्या अध्यक्षा रेखाताई गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली.
यावेळी शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, युवा सेना उपजिल्हा अधिकारी सागर नाणोसकर, उपतालुका प्रमुख संतोष गोवेकर तसेच शाळेतील शिक्षिका प्रियांका साळगावकर,नंदनी आचरेकर, सरोज चव्हाण, संगीता करंडे, सच्चिदानंद राऊळ, रुपेश सावंत, डॉ सावंत आदींसह ग्रामस्थ शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी रेखाताई पुढे म्हणाल्या गेली तीस वर्षे आपण माऊली महिला मंडळ शिरोडा ही संस्था सुरू केली असून विनाअनुदानित तत्त्वावर ही संस्था हे शिवधनुष्य गेली १४ वर्षे पेलत आहे. या संस्थेला शासनाने अनुदान द्यावे यासाठी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. या संस्थांना अनुदान द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. गेल्या १४ वर्षात कमी पगारावर येतील कर्मचारी काम करत असून शिक्षक आपली सेवा देत आहेत. कर्णबधिर मुलांची शाळा शिरोडा येथे असून त्याला अनुदान देण्यात आले आहे. मात्र आरोस येथील माऊली मतिमंद विद्यालयला अद्याप अनुदान मिळालेले नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आता ही संस्था बंद करायची का अशी परिस्थिती आली असून हा समाजाचा टाकलेला वसा कसा टाकायचा असा सवालही त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
मात्र हे केलेले काम निश्चितच वाखाणण्याजोगे असून या संस्थेला सर्वांनी बळ देण्याची गरज असल्याचे शिवसेना उपजिल्हा संघटक जिल्हा महिला संघटक जानवी सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. विशेष म्हणजे हे अभिमानास्पद काम महिला मंडळ करते हे वाखाणण्याजोगे आहे दिव्यांग मुलांना शाळेत आणण्यास शिक्षक आणि प्रशिक्षक हवेत त्यामुळे या मुलांना सर्वांसोबत शाळेत न शिकवता त्यांना वेगळे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे असल्याचा मुद्दा आपण जिल्हा परिषद मध्ये यापूर्वी मांडला असल्याचे त्या म्हणाल्या यावेळी रूची राऊत तिचा वाढदिवस मतिमंद मुलीच्या हस्ते केक कापून करण्यात आला. मुलांना खाऊ तसेच संस्थेला रोख स्वरुपात देणगी देऊन तिने हा वाढदिवस मतिमंद मुला समावेत त्यांच्या विद्यालय मध्ये साजरा केला. यावेळी विद्यालयाच्या वतीने तिला गुलाबाचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले तर शिवसेनेच्या वतीने विद्यालयाला दोन सिलिंग फॅन भेट देण्यात आले. भविष्यात या विद्यालयासाठी निश्चितच चांगले काम आपण करू असा विश्वास रूची राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी या विद्यालयाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या चिरे दगड आपण देण्याची देणार असल्याचे उपतालुकाप्रमुख गोवेकर यांनी जाहीर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षक प्राणेश नाईक यांनी केले.

4