किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर…

7
2
Google search engine
Google search engine
Google search engine

देवगड,ता. २१: किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर, तर सचिवपदी बाळा कदम यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. या समितीची नवीन कार्यकारिणी नेमण्यासंदर्भात नुकतीच बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नुतन समिती गठीत करण्यात आली.
दरम्यान, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सह सचिव यशपाल जैतापकर, खजिनदार रविकांत राणे आणि सह खजिनदार प्रवीण तरवडकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय सावंत, गणेश मिठबावकर, प्रदीप साखरकर, प्रदीप मिठबावकर आणि इम्रान मुकादम यांना घेण्यात आले आहे. समिती अधिक सक्षम करण्यासाठी किल्ले संवर्धन समिती, युवा समिती, महिला समिती आदी समित्या गठीत करण्यात येणार आहेत. उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेरणोत्सव समितीच्यावतीने पे अॅन्ड पार्किंग तसेच पर्यटक विसावा केंद्राचे उद्धाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष व सल्लागार राजीव परूळेकर आणि नुतन अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी केले आहे.

\