युवासेनेतर्फे कणकवलीत ३ ऑगस्टला महारक्तदान शिबिर…

2

कणकवली, ता.३१: शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर कणकवलीत 3 ऑगस्टला महारक्तदान शिबिर होणार आहे. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हा रक्तदानाचा कार्यक्रम होईल. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, आमदार वैभव नाईक, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, भारतीय कामगारसेना नेते संतोष सावंत, युवा सेना विस्तारक राम राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महारक्तदान शिबिरास शिवसेना त्याचप्रमाणे युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना जिल्हाध्यक्ष गीतेश कडू यांनी केले आहे.

0

4