मालवणात ११ ऑगस्टला तालुकास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा…

2

“आस्था” ग्रुपचे आयोजन…

मालवण, ता. ३१ : आस्था ग्रुपच्यावतीने ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी (लहान गट) व इयत्ता नववी ते बारावी (मोठा गट) अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. लहान गटातील विजेत्या व उपविजेत्या संघाला अनुक्रमे २०००, १५००, तर मोठ्या गटासाठी २५०० व २००० रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धक संघांमध्ये कमीत कमी सात, तर जास्तीत जास्त बाराजण सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करता येणार नाही. नाव नोंदणीसाठी स्पर्धाप्रमुख बंटी केनवडेकर मोबा. ९४२२५९६६८२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांनी केले आहे.

3

4