कणकवली शहरात रंगपंचमी उत्साहात…

10
2

विविध रंगाची उधळण ; तरुणाई झाली बेधुंद…

कणकवली,ता.२१ : शहरात आज विविध रंगांची उधळण करत रंगपंचमी उत्‍सव साजरा करण्यात आला. यात बाजारपेठ ढालकाठी आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर अॉर्केस्ट्रामधील अनेकविध गाण्यांच्या तालावर तरूणाई बेधंुदपणे थिरकली. शहरात महिला, युवतींसह बच्चे कंपनीही रंगपंचमीमध्ये न्हाऊन निघाली होती.
रंगपंचमी उत्‍सवानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून विविध रंग, पाणी आणि म्‍युझिक व्यवस्था मोफत उपलब्‍ध करून देण्यात आली होती.
शहरातील बाजारपेठ ढालकाठी मित्रमंडळानेही रंगोत्‍सवाचे आयोजन केले होते. तर महापुरूष मंदिर नजीक महापुरूष मित्रमंडळाचा रंगोत्‍सव कार्यक्रम झाला. यात रत्‍नागिरी येथील कलावंतांनी ऑर्केस्ट्रा सादर केला. येथील रंगपंचमी उत्‍सवात बाजारपेठेतील अबालवृद्ध मंडळींनी सहभाग घेऊन रंगांची उधळण केली. या ठिकाणी रेन शॉवरचीही उपलब्‍धता करण्यात आली होती.
शहरातील पटकीदेवी मित्रमंडळ, बांधकरवाडी, पिळणकरवाडी, कनकनगर, तेलीआळी, हर्णेआळी, वरचवाडी, परबवाडी, नाथ पै नगर, या ठिकाणी देखील रंगांची उधळण करण्यात आली.

4