जनसंवाद अभियानास उद्या माणगांव येथून सुरवात…

160
2

१ ते १८ ऑगस्ट या काळात आम. वैभव नाईक साधणार जनतेशी संवाद…

मालवण, ता. ३१ : गेल्या पाच वर्षात केलेली कामे आणि यापुढेही केल्या जाणाऱ्या कामांची जनतेला माहिती देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी ‘जनसंवाद अभियान’ हाती घेतले आहे. उद्या १ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत कुडाळ- मालवण तालुक्यातील प्रत्येक बुथवर जाऊन जनतेला केलेल्या कामांची ते माहिती देणार आहेत.
जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यात आमदार वैभव नाईक यशस्वी ठरले आहेत. कुडाळ- मालवण मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांनी चांदा ते बांदा, कृषी यांत्रिकीकरण, नाबार्ड, बजेट, जिल्हावार्षिक योजना, २५/१५ ग्रामविकास निधी, मुख्यमंत्री सहय्यता निधी,आमदार फंड, डोंगरी विकास या विविध योजनांमधून कोट्यवधींची विकास कामे मार्गी लावली आहेत. शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी, मच्छीमार, महिला व गरीब, गरजू व्यक्तींना थेट लाभ मिळवून देण्यास त्यांनी प्राधान्य दिले. मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या गावात शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती व्हावी. कित्येक लोकांच्या अजूनही प्रलंबित असलेल्या समस्या जाणून त्या सोडवाव्यात, विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या लोकांना शासकीय योजनांची माहिती द्यावी. जनतेशी मुक्तपणे संवाद साधावा, मागील पाच वर्षाप्रमाणे यापुढील काळात देखील लोकाभिमुख विकास कार्य करावे त्यादृष्टीने आमदार वैभव नाईक हे जनसंवाद अभियान” येत्या १ ऑगस्ट पासून १८ ऑगस्ट या कालावधीत राबविणार आहेत.
मतदारसंघातील जिल्हापरिषद विभागानुसार प्रत्येक गावातील प्रत्येक बूथपर्यंत अशा २७७ बुथवर १८ दिवसांत आमदार वैभव नाईक हे स्वतः भेट देऊन गेल्या पाच वर्षात बूथ निहाय केलेल्या विकासकामांची माहिती देणार आहेत. तसेच थेट ग्रामस्थांशी मुक्तपणे संवाद साधणार आहेत. या जनसंवाद अभियानात विकासकामांतून आम. वैभव नाईक यांनी जनसेवेचे आणि जनकल्याणाची केलेली उद्दिष्ट पूर्ती उलघडणार आहे.
जनसंवाद अभियानाची सुरुवात १ ऑगस्टला माणगाव दत्तमंदिर येथून होणार आहे. २ ऑगस्टला आंब्रड विभाग, ३ ऑगस्टला तेंडोली विभाग, ४ ऑगस्टला पोईप, ६ ऑगस्टला वेताळबांबर्डे विभाग, ७ ऑगस्टला घावनळे विभाग, ८ ऑगस्टला कसाल विभाग, ९ ऑगस्टला पेंडूर विभाग, १० ऑगस्टला देवबाग विभाग, ११ ऑगस्टला मसुरे विभाग, १२ ऑगस्टला आचरा विभाग, १४ ऑगस्टला हिवाळे विभाग, १६ ऑगस्टला पिंगुळी, १७ ऑगस्टला नेरूर, १८ ऑगस्टला पावशी या सर्व विभागातील प्रत्येक बुथवर हे अभियान राबविले जाणार आहे.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ- मालवण विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश पाटील, महिला संपर्क प्रमुख सूचिता चिंदरकर, कुडाळ तालुका संपर्क प्रमुख बाळा म्हाडगूत, मालवण तालुका संपर्क प्रमुख अशोक इंदूरलकर, जिल्हाप्रमुख (सावंतवाडी, कणकवली)- संजय पडते, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जि. प. सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे , अभय शिरसाट, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संजय भोगटे, नितीन वाळके, भाऊ परब, अतुल बंगे, संतोष शिरसाट, प्रसाद मोरचकर, बाबा आंगणे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, पं स सदस्य, सरपंच, ग्रा. प सदस्य, शाखाप्रमुख, बूथप्रमुख, प्रभागप्रमुख, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, मालवण महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत , युवासेना कुडाळ तालुका प्रमुख राजू जांभेकर, युवासेना मालवण तालुका प्रमुख मंदार गावडे यांनी केले आहे.

4