Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुसळधार पावसामुळे काळसेत शेतमांगर कोसळला...

मुसळधार पावसामुळे काळसेत शेतमांगर कोसळला…

सहा गुरे बचावली ; दुर्घटनेत २ लाखाचे नुकसान…

मालवण, ता. ३१ : गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका काळसे गावाला बसला आहे. काल रात्री अतिवृष्टीमुळे काळसे माळकेवाडी नजीक ब्राह्मणदेव परिसरातील शेतकरी दत्तात्रय मालवणकर यांच्या घराशेजारील मांगर कोसळला. यावेळी श्री. मालवणकर यांचा मुलगा सुनिल मालवणकर कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे ते घरात नसल्याने कोसळण्याच्या आवाजामुळे कुटुंबीयांचे मात्र धाबे दणाणले.
सुदैवाने मांगराच्या दोन भिंती बाहेरच्या बाजूला कोसळल्या. त्यामुळे मांगरात बांधलेल्या सहा गुरांना काही दुखापत झाली नाही. यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दत्तात्रय मालवणकर यांच्या शेजारी राहणारे अजिंक्य मालवणकर यांनी मोठ्या धाडसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून अर्धवट कोसळलेल्या मांगरात प्रवेश केला आणि सर्व सहा गुरांना सुखरूप बाहेर काढले. त्याबद्दल अजिंक्य मालवणकर यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
दरम्यान या दुर्घटनेत दत्तात्रय मालवणकर यांचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच अर्धवट कोसळलेल्या मांगराचा उर्वरित भाग मालवणकर यांच्या राहत्या घरावर कोसळण्याची शक्यता असल्यामुळे आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने धोकादायक भिंती सुरक्षितरित्या पाडण्यात आल्या. त्यामुळे पुढील धोका टळला. ग्रामपंचायत सदस्य सहदेव गोसावी यांनी  दुर्घटनास्थळी भेट देउन पाहणी केली तसेच गोपाळ माड्ये, अमित मालवणकर, मधुकर मालवणकर, चंद्रशेखर माड्ये,चंद्रकांत पाटील, मनोज मालवणकर, रंगनाथ चुडनाईक , विजय गोसावी, अजिंक्य मालवणकर यांनी मदतकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments