जिल्हा परिषद आरोग्य सभापती अनिशा दळवी यांच्या गाडीला अपघात

2

बांदा, ता.०१ : जिल्हा परिषद आरोग्य सभापती सौ.अनीषा दळवी यांच्या सरकारी गाडीला बैल आदळल्याने अपघात झाला आहे.
यात बैलाचा जागीच मृत्यू झाला मात्र सुदैवाने गाडीचे चालकासह सौ दळवी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मळगाव येथे झाराप-पत्रादेवी महामार्गावर घडला. दरम्यान दुसऱ्या गाडीच्या साह्याने त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ओरोसच्या दिशेने रवाना केली. दळवी या ओरोस येथे जिल्हा परिषदेच्या बैठकीसाठी जात होत्या. त्यावेळी हा अपघात घडला. यावेळी बांद्याचे उपसरपंच अक्रम खान,विनायक राऊळ, सुधीर वराडकर,संदीप बांदेकर, बंड्या खान आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

4