व्हीक्टर डांन्टस पूणे येथे मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी…

501
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.०१: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक, राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व्हीक्टर डांन्टस यांच्या मोटरसायकलला पूणे येथे अपघात झाला. त्यांच्या हातास गंभीर स्वरूपाचा मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शिवाजीनगर पूणे येथील ओयस्टर हॉस्पीटलमध्ये उपचार असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे हॉस्पीटलच्या डॉक्टरनी सांगीतले आहे. कामानिमित्त ते पूणे येथे गेले असता मोटर सायकलवरून प्रवास करतांना हा अपघात झाला. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर स्वरूपाची जखम होवून त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आले. हॉस्पीटलचे शोल्डर स्पेशालिस्ट डॉ.तपस्वी व त्याच्या टिमने हातावर शत्रक्रीया केली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, बँकेचे संचालक अविनाश माणगांवकर, दिगंबर पाटील, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण आदींनी मंगळवारी पूणे येथे जावुन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.

\