आमदार वैभव नाईक यांच्या जनसंवाद अभियानाला माणगाव येथून सुरुवात

2

कुडाळ, ता. १ : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार वैभव नाईक हे सज्ज झाले आहेत. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या संकल्पनेतून अठरा दिवस राबविल्या जाणार्‍या ‘जनसंवाद’ अभियानास आज माणगाव दत्तमंदिर येथून मोठ्या दिमाखात सुरवात झाली. अभियानाच्या पहिल्याच दिवशी या संवाद यात्रेस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जनसंवाद अभियानाच्या निमित्ताने आज सकाळी साडे अकरा वाजता आमदार नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांनी माणगाव येथील दत्तमंदिरात अभिषेक, आरती करत आशीर्वाद घेतले. त्यानंतर जनसंवाद यात्रेस सुरवात झाली. यात माणगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघातील वॉर्ड ५ मध्ये त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला.
शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी, मच्छीमार, महिला व गरीब गरजू आजारी व्यक्तींना थेट लाभ मिळवून देण्यास आमदार नाईक यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांचे हे कार्य सर्वदूर पसरले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचावी, सर्वसामान्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या जाणून घेत त्या सोडवाव्यात, विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या लोकांना शासकीय योजनांची माहिती देत त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधावा. मागील पाच वर्षाप्रमाणे या पुढील काळात देखील लोकाभिमुख विकास कार्य करावे यादृष्टीने आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून ’जनसंवाद अभियान’ राबविण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
माणगाव मंदिर येथून सुरू झालेल्या या अभियानात महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, उपसभापती श्रेया परब, माणगाव विभागप्रमुख राजन बोभाटे, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश धुरी, आप्पा मुंज, श्री. माणगावकर, शैलेश विणोडकर, सुनील सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

20

4