जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्याचा मार्ग मोकळा

242
2

कृती समिती नेमण्याचे आदेश: पालकमंत्री दीपक केसरकरांच्या प्रयत्नांना यश

सावंतवाडी.ता,१: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आवश्यक सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करण्यासाठी संचालनालयाच्या स्तरावरून कृती समिती स्थापन करण्याच्या आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालकांनी दिले आहेत.
यासाठी पालक मंत्री दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी संजय भोगटे यांनी दिली. याबाबतचे पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात सिंधुदुर्गसह नंदुरबार सातारा परभणी बुलढाणा अमरावती नाशिक यासाठी सात ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हिरवा कंदील मिळाला आहे. असा दावा श्री भोगटे यांनी केला आहे.

4