गोवा नाबार्ड अधिकाऱ्यांकडून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं कौतुक

2

सिंधुदुर्गनगरी ता.०१:
गोवा राज्य नाबार्डच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला व बँकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांना व प्रकल्पाना प्रत्यक्षात भेटी दिल्या व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कारभारा बाबत समायधान व्यक्त करत बँकेच्या कामाचं
कौतुक केल. गोवा नाबार्डच्या महाप्रबंधक कामाक्षी पै यांनी जिल्हा बँक नाबार्डच्या सर्व योजनांचा पाठपुरावा करत आपली प्रगती करत आहे, हे प्रशंसनीय असून बँकेने राबविलेल्या विविध योजना या बँक हिताच्या आहेत. हि बँक राष्ट्रीय बँकांच्या एक पाऊल पुढे जाऊन बँकेच्या ग्राहकांच्या हिताचा विचार करते व विविध माध्यमातून सेवा पुरवते, त्याच बरोबर जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी काम करते ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी या भेटीच्या वेळी सांगितले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी नाबार्ड अधिकाऱ्यांचे स्वागत केले
गोवा नाबार्डच्या महाप्रबंधक कामाक्षी पै, उपमहाप्रबंधक वसंत सातार्डेकर, सहा.प्रबंधक एम विनयकुमार, जिल्हा प्रबंधक सुशील नाईक, प्रबंधक नितीन चौगुले आदिनी मान्यवरांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला व भगीरथ प्रतिष्ठानला भेटी दिल्या. बँकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या लेअर व गावठी कोंबडी, शेळी मेंढी पालन, बायोगॅस प्रकल्प, इकोफ्रेंडली गणेश मूर्ती प्रकल्प युपीएनआरएम प्रकल्प या विविध योजनांना व प्रकल्पाना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर उपस्थित होते

9

4