कोकणात आभाळ फाटले; मांडुकलीत पुन्हा पाणी भरले

2

गगनबावडा कोल्हापूर मार्ग ठप्प; पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; वाहतूक फोंडामार्गे वळविली

वैभववाडी ता.०१: कोकणात गेल्या पाच दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरूवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने दुपारपासून हा मार्ग ठप्प झाला आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.
गेल्या पाच दिवसापासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळत आहे. तर राधानगरी धरण १०० टक्के भरले असून या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मांडुकली, किरवे, लोंघे येथे गुरूवारी दुपारी पुन्हा रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान वैभववाडी पोलिसांनी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर वैभववाडी येथे बॕरिकेट्स लावले आहेत. कोल्हापूरकडे वाहतूक करणाऱ्या वाहनांनी फोंडाघाट मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

16

4