अपघाती मृत्यू प्रकरणी मोटरसायकल चालकाची निर्दोष मुक्तता

2

कणकवली, ता.1 ः नांदगाव-पावाचीवाडी येथे मुंबई-गोवा हायवेवर 25 जानेवारी 2017 रोजी रमेश बापू राणे (रा.टेंबवली) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी मोटरसायकलचालक प्रशांत प्रकाश राणे (रा.टेंबवली,ता.देवगड) यांची सबळ पुराव्याअभावी कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जमादार यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे अ‍ॅड.सौ.निकिता म्हापणकर यांनी काम पाहिले.
नांदगाव पावाचीवाडी येथे 25 जानेवारी 2017 रोजी मोटरसायकल अपघात घडला होता. या अपघातात रमेश बापू राणे यांचा अपघाती मृत्यु झाला होता. या प्रकरणी मोटरसायकलचालक प्रशांत प्रकाश राणे (रा.टेबवली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. परंतु आरोपी विरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळून न आल्याने कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जमादार यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

4