तासभर वाहतूक ठप्प; जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवून वाहतूक पूर्ववत
वैभववाडी ता.०१ :येथील उंबर्डे मार्गावर पिंपळवाडी नजीक गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. मार्ग बंद झाल्याने विद्यार्थी व कर्मचारी अडकून पडले होते. सा. बां. ने जेसीबीने झाड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
झाड कोसळल्याने उंबर्डे – वैभववाडी मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. यात विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी व बँक कर्मचारी अडकून पडले होते. स्थानिकांनी तहसील व सा. बां. विभागाला दूरध्वनी करून याबाबत माहिती दिली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थ, प्रवाशांनी रस्त्यावरील झाडांच्या काही फांद्या तोडून बाजूला केल्या. त्यानंतर एकेरी वाहतुक सुरु झाली.