चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस १ वर्षाचा कारावास

2

वेंगुर्ले : ता.१
चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी भटवाडी-वेंगुर्ला येथील आरोपी सागर प्रभाकर नांदोस्कर याला भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा १८८१चे कलम १३८ अंतर्गत दोषी मानून एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा तसेच चेकची रक्कम व खर्च असे मिळून २ लाख ९२ हजार रुपये व ६ हजार रुपये नुकसान भरपाई फिर्यादी याला एका महिन्याच्या कालावधीत न दिल्यास आणखी एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा असा निकाल न्यायाधीश वि.द.पाटील यांनी दिला आहे. फिर्यादीच्यावतीने अॅड. मनिष सातार्डेकर यांनी काम पाहिले.
परबवाडा येथील कृष्णा दत्तात्रय साटेलकर यांच्याकडून आरोपी सागर प्रभाकर नांदोस्कर याने शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवितो व आपण शेअर मार्केटींगच्या एजंट आहे असे सांगून फिर्यादी याच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, आरोपी हा शेअर मार्केटींचा एजंट नसल्याचे फिर्यादीला समजल्याने त्याने आरोपीकडे पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास आरोपीने टाळाटाळ केली. यानंतर त्याने आपल्या सारस्वत बँक शाखा वेंगुर्ला या खात्यावरील चेक फिर्यादीला दिला. फिर्यादी याने सदरचा चेक बँकेत जमा केला असता आरोपीच्या खात्यावर पैसे नसल्याने तो बाऊंन्स झाला. सबब फिर्यादी याने अॅड. मनिष सातार्डेकर यांच्या मार्फत आरोपीच्या विरुद्ध वेंगुर्ला न्यायालयात चेक बाऊंन्सची केस दाखल केली व त्याबाबतचे सबळ पुरावे न्यायालयात मांडले. फिर्यादीच्यावतीने अॅड.सातार्डेकर यांनी मांडलेले पुरावे व केलेला युक्तीवादी ग्राह्य मानून सबळ पुराव्याअंती न्यायालयाने आरोपी सागर नांदोस्कर ३० जुलै रोजी शिक्षा सुनावणी व दंड केला.

5

4