पालकमंत्री दीपक केसरकर २,३,४ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

432
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१ : – राज्‍याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर हे दिनांक 2,3व 4 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2019 रोजी सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव.
शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.00 वा. विकास खरगे, सचिव, वने यांच्या समवेत एम.आय.डी.सी. कुडाळ येथे चर्चा, सकाळी 9.30 वा. ग्रामपंचायत सभागृह, हिर्लोस, ता. कुडाळ येथे चांदा ते बांदा अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम व बायफचे विद्यमान कुक्कुटग्राम योजनेअंतर्गत महिला गटांचा मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10.00 वा. कुडाळ येथून मोटारीने बांदाकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा. बांदा येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद सदस्य, सतपंच, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कोकण कृषि विद्यापीठाचे प्राचार्य, सायनेजर संबंधित सर्व एक्सपर्ट, आर.टी.ओ. व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बांदा ते ओरस महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या सायनेप्सची पाहणी तसेच महामार्गाची पाहणी, सकाळी 10.45 वा. बांदा पोलीस स्टेशनची पाहणी, सकाळी 11.00 वा. रेडे गुमुटच्या गावास सरपंच, सदस्य व गावकरी यांच्या समवेत भेट, दुपारी 12.30 वा. पाहणी संपल्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी 1.00 वा. पोलीस अधिक्षक, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे चर्चा, दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे चांदा ते बांदा अतंर्गत सर्व विभागांची बैठक, दुपारी 2.30 वा. राखीव, दुपारी 3.00 वा. बैठक पुढे सुरू, सायं. 6.00 वा. विभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सावंतवाडी नगर परिषद व संबंधित अधिकारी यांच्या समवेत मोनोरेलची पाहणी, सायं. 6.30 वा. उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी सावंतवाडी नगर परिषद यांच्या समवेत प्लॅनीटोरियमची पाहणी, नंतर सावंतवाडी येथे राखीव व मुक्काम.
रविवार दि. 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10.00 वा. पानवळ बांदा येथे बांदा प्रसारक मंडळ, बांदा आयोजित इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.30 वा. मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, सोईनुसार वेंगुर्ला येथून मोटारीने गोवाकडे प्रयाण