परुळेत मच्छिमार व सागर सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन

2

वेंगुर्ले : ता.१: भारतीय तटरक्षक दल मार्फत वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायत येथे मच्छीमार व सागर सुरक्षा रक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले.भारतीय तटरक्षक दल रत्नागिरी यांच्या वतीने आपती व्यवस्थापन  विषयक मार्गदर्शन ग्रामपंचायत परुळेबाजार येथे संपन्न झाले. यावेळी तटरक्षक दलाचे अधिकारी श्री वारे साहेब व त्यांचे सहकारी श्री चौधरी, पोलीस उपनिरीक्षक साठे, सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच विजय घोलेकर, परवाना अधिकारी मस्तविभाग संतोष खाडे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम पेडणेकर, ग्रामसेवक शरद शिंदे, पोलीस बी. बी. गिरकर, संतोष कांबळे यांसह सागर सुरक्षा दलाचे रमेश गावडे, सुधाकर पेडणेकर,  सुहास बोवलेकर, आनंद सारंग यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नैसर्गिक आपत्ती काळात करावयाच्या उपाय योजना  काळजी व वापरण्याची साधन सामुग्री याविषयीं माहिती देण्यात आली. तसेच कोस्टगार्ड मधील नोकरी च्या संधी व त्याबद्दल  माहिती देण्यात आली. होडी परवाना तसेच चांदा ते बांदा या योजनेतील विविध लाभ याविषयी माहिती देण्यात आली.

13

4