गावात नवीन जन्मलेल्या मुलींसाठी देणार आपले ५० टक्के मानधन
वेंगुर्ले : ता.१:
लेक वाचवा लेक शिकवा या साठी शासन स्तरावर खूप प्रबोधन सुरू आहे. मात्र केवळ तेवढ्यावर न थांबता ही शिकवण गावातील लोकांनी आचरणात आणावी यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा सरपंच पप्पु परब यांनी सरपंच मानधनामधुन आपले ५०% मानधन गावातील जन्माला येणाऱ्या नवजात मुलींना देण्याचा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे श्री परब यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत परबवाडा व दिवाणी न्यायालय वेंगुर्ला मधील विधी सेवा समिती यांच्या वतीने परबवाडा येथे लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्कार व त्यासंबंधी कायदा यांचे महिलांना मार्गदर्शन करण्यांत आले. यावेळी अॅड. श्री. जी. जी. टांककर, अॅड. चैतन्य दळवी. अॅड. अक्षदा राऊळ, सेवानिवृत्त शिक्षक का. हू. शेख. ग्रामपंचायत सदस्य संताेष सावंत, हेमंत गावडे, अर्चना परब, कृतिका साटेलकर, ग्लॅनेस फर्नांडिस, सखी पवार. ग्रामसेवक बाेडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, सी.आर.पी. गाैरी सावंत, अॅना डिसाेजा व महिला बचतगटातील महिल वर्ग, ग्रामस्थ, युवावर्ग उपस्थित हाेते. या कार्यक्रमात श्री. परब यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.