शनिवारी १० ऑगस्ट रोजी सभेचे आयोजन आठ महिन्यानंतर होतेय सभा
सिंधुदुर्गनगरी.ता,२: सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास समितीची सभा तब्बल आठ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर १० ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी होत आहे. लोकसभा निवडणूक आचार संहितेनंतर होत असलेल्या या नियोजन बैठकीत २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा खर्च आढावा आणि २०१९ – २० या आर्थिक वर्षासाठी मंजूर २२५ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुट्टीच्या दिवशी ही सभा लावल्याने प्रशासनात जोरदार नाराजी आहे.
जिल्हा नियोजन समितीची सभा १८ जानेवारी २०१९ रोजी आठ महिन्यांपूर्वी झाली होती. ही सभा विविध विषयांवर जोरधार गाजली होती. या सभेनंतर लोकसभा निवडणुकीची लागलेली आचारसंहिता यामुळे ही सभा उशीराने होत आहे.या सभेत गत वर्षी प्राप्त १८९ कोटी विकास निधिचा झालेला खर्च याचा आढावा घेण्यात येणार असुन चालु सनं २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी प्राप्त २२५ कोटी रुपयांच्या निधिचे नियोजन करण्यात येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यमान कालावधीतील ही शेवटची जिल्हा नियोजन सभा असण्याची शक्यता आहे.