भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

114
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.०२:येथील भारतीय जनता पार्टी व प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण पुरस्कृत ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा सोहळा येथील साईमंगल कार्यालयात संपन्न होणार आहे .
वेंगुर्ले तालुक्यातील शैक्षणिक , कला व क्रीडा क्षेत्रातल्या १५० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे . शालेय गटातील स्काॅलरशीप पासून पदविधर गुणवंतांचा सत्कार , त्याचप्रमाणे कला व क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवलेल्यांचा ही सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या २५ मुलांचाही सत्कार होणार आहे. तसेच गरीब मुलांना शालेय पास , वह्या – पुस्तकांची मदत तसेच गणवेश वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमात १०० % निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमात प्रदेश चिटनीस राजन तेली , प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण , नगराध्यक्ष राजन गिरप , उपसभापती स्मिता दामले , खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवुलकर , बॅ.नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवनकर व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे.

\