‘जनसंवाद’ अभियानास आंब्रड विभागातही उत्स्फूर्त प्रतिसाद…

257
2

आमदार वैभव नाईक कॅबिनेट मंत्री होतील ; अभियानात ग्रामस्थांनी व्यक्त केला विश्वास…

कुडाळ, ता. २ : गेल्या पाच वर्षांच्या काळात युती शासनाच्या माध्यमातून कुडाळ मतदार संघात झालेल्या विकासकामांची माहिती प्रत्येक व्यक्तीला व्हावी. सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्याचे तत्काळ निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून काल पासून सुरू झालेल्या ‘जनसंवाद अभियानास’ जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी आंब्रड विभागात पोचलेल्या या अभियानास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दरम्यान सर्वसामान्यांचा आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार वैभव नाईक कॅबिनेट मंत्री होतील असा विश्वास ग्रामस्थांनी या अभियानाच्या निमित्ताने व्यक्त केला.
अभियानाच्या निमित्ताने आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून त्या त्या विभागात झालेल्या विकासकामांवर ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. आमदार श्री. नाईक घेत असलेल्या घर बैठकांनाही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अभियानाच्या निमित्ताने गावागावात पोचलेले आमदार शेती हंगाम सुरू असल्याने स्थानिक शेतकऱ्यांसोबत स्वतः भात लावणीत सहभागी होत आहेत. आज आंब्रड विभागातील आंब्रड भगवती मंदिर, कुंदे, पोखरण याठिकाणी आम. नाईक यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. अभियानाच्या निमित्ताने आम. नाईक यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे.
या अभियानात तालुका प्रमुख राजन नाईक, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, उपतालुका प्रमुख महेश सावंत, जि. प. सदस्य वर्षा कुडाळकर, महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी, युवासेना विभाग प्रमुख निशांत तेरसे, सुयोग ढवण सुशील परब, उपविभाग प्रमुख धीरेंद्र चव्हाण आदी सहभागी झाले होते.

4