कृती समितीचे आवाहन: प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा करू
सावंतवाडी ता,०२: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय हवे या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेला “जनरेटा” कायम तसाच ठेवावा. त्याचबरोबर प्रत्यक्ष निधी मिळून काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा करू असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान आगामी काळात होणाऱ्या निवडणुका येतील जातील परंतु या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत प्रशासनाला विसर होता नये यासाठी येथील नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे असेही आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह नऊ जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे अशी मागणी घेऊन गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या माध्यमातून प्रसिद्धीपत्रक देण्यात आले आहे.
यात असे नमूद करण्यात आले आहे की
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती , जिल्हा सिंधुदुर्ग च्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, याबाबत “जनरेटा” निर्माण करण्यात आला. सर्व राजकीय पक्षांसह सर्व नेत्यांना निवेदन देण्यात आले होते त्याचबरोबर सावंतवाडी वेंगुर्ले व दोडामार्ग या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करून पत्रांची मोहीम राबवण्यात आली होती यात सरपंच उपसरपंचासह नगराध्यक्ष नगरसेवक सहभागी झाले होते या मोहिमेअंतर्गत दोडामार्ग मधून सात हजार तर सावंतवाडीहून दहा हजार पत्रे पाठविण्यात आली होती शासकीय महाविद्यालय जिल्ह्यात व्हावे ही जनतेची भावना होती त्याला कृती समितीच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम करण्यात आले होते लोकांनी या उपक्रमाला चांगली साथ दिली त्यामुळे हा प्रश्न यशस्वी होऊ शकला असे यात म्हटले आहे