लाच स्वीकारल्याप्रकरणी कुडाळच्या वनक्षेत्रपाल व क्लार्कचे निलंबन

258
2

कुडाळ, ता.०२ : झाड तोडीचा परवाना देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कुडाळचे वनक्षेत्रपाल प्रदीप गोविंदराव कोकितकर ( वय ४०,रा.कुडाळ एमआयडीसी, मूळ.रा.गडहींग्लज) यांच्यासह क्लार्क रवींद्र भिकाजी भागवत ( वय.५६,रा.कुडाळ,मुळं रा.तरेळे-दत्तमंदिर जवळ) या दोघांना आज निलंबित करण्यात आले. ही कारवाई वनविभागाच्या सचिवांकडून करण्यात आली. याबाबत सावंतवाडीचे वन अधिकारी समाधान चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
कुडाळ येथील एका व्यक्तीकडून झाड तोडीचा परवाना मिळवण्यासाठी या दोघांनी पाच हजार रुपये, दीड हजार रुपये व चार हजार रुपये अशी लाच मागितली होती. याप्रकरणी संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात या दोघांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नव्हती त्.यामुळे वन विभागासह तेथील स्थानिक लोकात उलट सुलट चर्चा होती. दरम्यान आज त्या दोघांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

4