आंबा नुकसानीचा १४ कोटी ३२ लाख पिक विमा प्राप्त

160
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी.ता,२: प्रधानमंत्री पिक विमा योजनेतुन जिल्ह्यातील २ हजार ७२३ शेतकऱ्यांना १४ कोटी ३२ लाख रुपये एवढी नुकसानी प्राप्त झाली आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
हवामानावर आधारित ही फळ पिक विमा योजना आहे. २०१८ मध्ये आंबा पिकासाठी जिल्ह्यातील ३ हजार ३४७ शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेमार्फत १ कोटी ८५ लाख रूपये एवढा विमा वतरविला होता. हेक्टरी ६ हजार ५० रूपये नुकसानी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. आंबा पिक विमा देवगड ५५६ व मालवण ७१ एवढ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
काजू पिकासाठी हेक्टरी ४ हजार १८० रुपये विमा नुकसानी आहे. जिल्ह्यातील १८३ शेतकऱ्यांनी ६ लाख ९० हजार रूपये विमा उतरविला होता. त्यातील १५४ शेतकऱ्यांना ४० लाख ९४ हजार एवढा पिक विमा मंजूर झाला आहे. तर २९ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकलेला नाही. ज्या शेतकऱ्यांना विमा नुकसानी मिळालेली नाही, ती मिळण्यासाठी जिल्हा बँकेच्या पाठपुरावा सुरु आहे. यावर्षी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

\