हिंदु जनजागृती समितीची पोलीस अधिक्षकांकडे मागणी
सिंधुदुर्गनगरी.ता,२: स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकचा ध्वज विक्री करणाऱ्यांवर आणि ध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे. मात्र ही अस्मिता केवळ २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी नागरिकांमध्ये जागृत होते. यावेळी प्लास्टिकचे ध्वज विकत घेवून आपली राष्ट्राप्रती भावना व्यक्त केली जाते. मात्र दुसऱ्या दिवशी हे ध्वज रस्त्यावर, कचरा पेटीत आढळतात. त्यांची विटंबना होते. हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. शिवाय ज्या क्रांतीकारकांनी या ध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांची चेष्ठा केल्या सारखे होत असल्याचे स्पष्ट करत स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकचा ध्वज विक्री करणाऱ्यांवर आणि ध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. यावेळी हिन्दू जनजागृती समितीचे रवींद्र परब, डॉ. पूर्णेंदू सावंत, सुरेश दाभोलकर, गजानन मुंज व डॉ. सुर्यकांत बालम आदी उपस्थित होते.