आजाराला कंटाळून उभादांडा येथील वृद्धेची आत्महत्या

2

वेंगुर्ले.ता,२: उभादांडा-चमणकरवाडी येथील रहिवासी श्रीमती शुभदा रमाकांत रेडकर वय ७५ हिने आजाराला कंटाळून आपल्या घरानजीकच्या विहिरीत काल सायंकाळी उडी मारून आत्महत्या केली. या मृत्यूप्रकरणी वेंगुर्ला पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उभादांडा येथील सदरची महिला ही गेल्या दोन वर्षापासून ट्युमरच्या आजाराने त्रस्त होती. औषधोपचार करुनही गुण पडत नसल्याने तिने आत्महत्या केली असावी. याबाबतची खबर आजगाव-भोमवाडी येथील विठ्ठल सखाराम केदार यांनी वेंगुर्ला पोलीसांत दिल्याने या अकस्मित मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कास्टेबल श्री. दळवी करीत आहेत.

5

4