सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यू सदृश्य रुग्णांचा आकडा वाढला…

2

डॉ.मुरली चव्हाण;गणेश चतुर्थी काळात चाकरमान्यांनी दक्षता घ्यावी…

सावंतवाडी ता.०२:  येथील उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.गेल्या आठवडाभरात ५-६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी दरम्यान निष्पन्न झाले.हे सर्व रुग्ण मुंबई-पुणे येथून परतल्याचे समजते,त्यामुळे येत्या गणेश चतुर्थी काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी याबाबत दक्षता बाळगावी असे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी मुरली चव्हाण यांनी केले आहे.
गेल्या महिन्याभरात येथील कुटीर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.तर या आठवडयात रुग्णांचा आकडा ५-६ वर पोहचला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सद्यस्थितीत रुग्णालयात पाच ते सहा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती सुद्धा यावेळी बोलताना श्री.चव्हाण यांनी दिली.

8

4