राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्चना फाउंडेशन आयोजित भव्य भजन स्पर्धेचा अंतिम सामना ४ ऑगस्ट रोजी…

2

खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन…

सावंतवाडी ता.०२: खासदार सुप्रीया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अर्चना फाऊंडेशन आयोजित भजन स्पर्धेची अंतिम फेरी दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वा. येथील बॅ.नाथ पै सभागृहात होणार आहे.यावेळी माजीराज्यमंत्री प्रवीण भोसले,सावंतवाडी विधानसभा पक्ष निरीक्षक अर्चना घारे-परब उपस्थितीत राहणार आहेत.
या पुर्वी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक फेरी घेण्यात आली होती.तर उद्या ३ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथे प्राथमिक फेरी होणार आहे.या तालुका स्तरीय सर्व फेऱ्यांमधून प्रत्येकी पाच संघांची निवड करण्यात आली आहे.या पंधरा संघातून अंतिम विजेते संघ निवडले जाणार आहेत.यावेळी भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अर्चना फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

12

4