किशोर मुसळे चॅरीटेबल ट्र्स्ट, मुंबई कडून म्हापण येथील १६० विद्यार्थ्यांना वह्यावाटप

2

वेंगुर्ले  ता.०२: किशोर मुसळे चॅरीटेबल ट्र्स्ट, मुंबई कडून वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील १६० विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले.म्हापण गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मागील १० वर्षे अखंडपणे किशोर मुसळे चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांचे मार्फत वह्यावाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. यंदाही म्हापण गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या १६० विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. पुर्ण प्राथ. केंद्रशाळा म्हापण नं. १ च्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. गौरवी मडवळ, म्हापण सरपंच श्री. अभय ठाकुर, श्री विकास गवंडे, श्री गुरुनाथ मडवळ, ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रकांत घाडी, सौ. अस्मिता गोसावी, श्रीम. प्राजक्ता केळुसकर, श्री. संजोग परब यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ट्रष्टच्या वतीने पदाधिकारी महाडीक मॅडम, जीमसन सर, खानोलकर सर, दाभोलकर सर, पखीरा मॅडम, सहा. प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, पालकवर्ग व विद्यार्थीवृद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26

4