सावंतवाडी.ता,०२: पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील प्रसाद बांदेकर याला आज येथील पोलिसांनी अटक केली.या प्रकरणात बांदेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता.मात्र न्यायालयाने तो फेटाळला व शरणागती पत्करावी असे आदेश न्यायालयाने दिले.मात्र त्या आदेशाची पूर्तता न झाल्यामुळे आज सावंतवाडी पोलिसांनी त्याला अटक केली.
पत्नी वैष्णवी बांदेकर हिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप पत्नीचा भाऊ पुष्पक माठेकर यांनी केला होता.तसेच याप्रकरणी त्याने सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली होती.त्यानुसार विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रसाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही घटना १२ नोव्हेंबरला घडली होती.दरम्यान २४ जुलैला मुंबई उच्च न्यायालयाने त्याला शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांकडून देण्यात आली.
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावंतवाडीत पतीला अटक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES