Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबिडवाडी मांगरवाडीतील विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

बिडवाडी मांगरवाडीतील विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

मृत्यूबाबत चौकशीची पतीची मागणी

कणकवली, ता. 2 ः तालुक्यातील बिडवाडी मांगरवाडी येथील विजया विठ्ठल वरक (वय 35) या महिलेला मृतदेह आज तेथील विहिरीत आढळून आला. कठडा नसलेल्या विहिरीत ती पाय घसरून पडल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. तर पती विठ्ठल वरक यांनी विजयाच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
विजया वरक यांचा मृतदेह आज सकाळी दहा वाजता मांगरवाडीतील जुन्या विहिरीत आढळून आला. विजया यांचे सासरे सकाळी गुरांजवळ गेले होते तर पती विठ्ठल हे कामाला गेले होते. सकाळी दहाच्या सुमारास विजया यांचा मृतदेह विहिरीत सापडल्याची माहिती त्यांचा मामेभाऊ बाबू जंगले यांनी फोनवरून दिली. त्यानंतर ते बिडवाडी येथे आपल्या घरी आले असता विजय यांचा मृतदेह विहिरीत दिसून आला. विजया यांना एक मुलगाही आहे. वाडीतील त्या कठडा नसलेल्या विहिरीत विजया घसरून कशा पडल्या? याबाबत पती विठ्ठल यांना शंका असल्याने त्यांनी पोलिसांकडे या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments