आंबेरी पुलावर दिवसभर पाणी….. वाहतूक खोळंबली: 27 गावांचा संपर्क तुटला, शाळकरी मुले अडकली

2

कुडाळ/ मिलिंद धुरी,ता. 2 माणगाव खोऱ्यात सकाळपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे आंबेरी निर्मला नदीला दिवसभर पूर होता त्यामुळे संध्याकाळ पर्यंत 27 गावांचा संपर्क तुटला होता फुलावर चे पाणी उचलण्यास सायंकाळचे सहा वाढल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या परिणामी शाळेतील मुलांना प्रवाशांना घरी जाण्यास गैरसोय झाली त्यामुळे प्रवासी रस्त्यावरच उभे राहिल्याचे चित्र होते याबाबत आपत्कालीन यंत्रणेला माहिती देऊन सुद्धा कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी त्या ठिकाणी आला नसल्यामुळे नागरिकातून व विशिष्ट शाळकरी मुलातून नाराजी व्यक्त करण्यात आली.आंबेरी हे पूल ब्रिटिश कालीन असल्यामुळे या पुलाची उंची कमी आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह लगेच वाढतो व दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबते. त्यामुळे हे पूल नव्याने बांधण्यात यावे अशी मागणी होत आहे

11

4