आचरा ता 2
शासनाकडून देण्यात आलेल्या एलईडी बल्ब चा खर्च ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता वसूल केला जात असल्यामुळे आज वाईंगणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आजरा वीज मंडळाचे अधिकारी सोनाली माने यांना धारेवर धरले चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात असेल तर आम्ही बिले भरणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी भाजपचे कार्यकर्ते माजी सभापती धोंडू चिंदरकर,चिंदर ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र हडकर,प्रकाश मेस्त्री, वायंगणी येथील उमेश सावंत,चंदू सावंत आदी वीज ग्राहक उपस्थित होते.
वायंगणी येथील उमेश सावंत यांना आलेल्या वीज बिलाच्या विवरण तक्त्यात समाविष्ट घटकांची बेरीज केली असता त्यांना बिलात तफावत आढळून आली.त्यामुळे त्यांनी बारकाईने बिलाची पहाणी केली असता बिलांच्या पुढील बाजूस चालू रिडिंग दर्शविणारया तक्त्याच्या खाली एकदम बारीक अक्षरात बल्बचा चार्ज बाबत ३८रू आकार समाविष्ट केले असल्याचे आढळून आले.यागोष्टीकडे माजी सभापती धोंडू चिंदरकर यांचा लक्ष वेधल्यावर काही सहकारयांसह त्यांनी आचरा बाजारपेठ येथील विद्युत कार्यालयावर धडक देत येथे उपस्थित सहाय्यक अभियंता सोनाली माने यांना जाब विचारला या बाबत माने यांनी २०१५मध्ये ३१२६ ग्राहकांनी घेतलेल्या चार बल्बची ११महिण्यात बिलामधून रिकव्हरी करण्याचा आदेश असून त्याचा आकार रू३८ बिलात सामाविष्ट केला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.यावर चिंदरकर,प्रकाश मेस्त्री, उमेश सावंत, देवेंद्र हडकर यांनी ज्यावेळी ग्राहकांना बल्ब वितरीत केले त्यावेळी केवळ शंभर रुपये घेऊन बल्ब देताना बिलातून रिकव्हरी केली जाण्याबाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती.हा ग्राहकांना फसविण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत वीज बिलात विवरण मध्ये दाखविण्यात येणाऱ्या बाबींचे स्पष्टीकरण करण्याची मागणी केली.सदर बाबत योग्य स्पष्टीकरण विद्युत कर्मचारयांकडून देण्यात न आल्याने संतापलेल्या वायंगणी,चिंदर सडेवाडी येथील ग्रामस्थांनी याबाबत विद्युत मंडळ अधिकारयांना लवकरच निवेदन देवून वीज बिलात आकारले जाणारे छुपे कराबाबत योग्य स्पष्टीकरण देत अनावश्यक कर कमी न केल्यास वीज बिलच भरणार नसल्याचा इशारा दिला आहे.