दीपक केसरकर: माझा राजकीय वारसदार शिवसैनिकच असणार
कुडाळ, ता. ३ : नारायण राणे सत्तेसाठी आणि मंत्रिपदासाठी नेहमी चुकीच्या गाडीत बसले.त्यामुळे ते आज अडचणीत आहेत.आज ते शिवसेनेत असते तर नक्कीच मोठे मंत्री असते मात्र आता त्यांनी पुन्हा “रिस्क” घेवू नये असा टोला पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मारला. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे माझे गुरुबंधू आहे. माझा राजकीय वारसदार शिवसैनिक असेल त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघात फिरावे. ते कुठच्याही पक्षात जाणार नाही. हा माझा विश्वास आहे असेही केसरकर म्हणाले.
श्री केसरकर यांनी आज कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर यांनी राणेंवर टीका केली. ते म्हणाले आज राणे शिवसेनेत असते तर मोठे नेते असते. त्यांना मानसन्मान असता परंतु ती सत्तेसाठी चुकीच्या गाडीत बसले त्यामुळे पुढे अडचण निर्माण झाली. परंतु आता त्यांनी कोणतीही रिस्क घेऊ नये. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेल्या आरोपाबाबत केसरकर यांना छेडले असता ते म्हणाले संजय पडते हे यापूर्वी काही चुकीच्या लोकांबरोबर होते. त्यांनी दगड मारायला शिकवले त्यामुळे पक्ष नेतृत्वात आदेश लक्षात घेऊन त्यांनी तसे काम केले. मात्र आता ते उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यामुळे आता पक्ष संघटना नक्कीच वाढवतील दगड मारणार नाही.