तिहेरी तलाक विरोधी विधेयकाचे वेंगुर्लेतील मुस्लिम महिला भगिनींने केले स्वागत

2

वेंगुर्ले.ता,३: तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेबरोबर राज्यसभेत मंजूर झाल्यावर भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील कॅम्प – गवळीवाडा येथील मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन महिला भगिनींची भेट घेतली. तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कशा प्रकारे मुस्लिम महिला भगिनींना जाचक रुढी परंपरेतुन मुक्ती दिली याबाबत सर्वीस्तर माहिती दिली. यावेळी सर्व मुस्लिम महिला भगिनींनी या निर्णयाचे स्वागत केले व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

वेंगुर्ले शहरातील कॅम्प – गवळी वाडा येथे अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण , नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , नगरसेवक सुहास गवंडळकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, सुरेंद्र चव्हाण, बुथप्रमुख प्रीतम सावंत, अस्लम शेख, सावंत काकी इत्यादी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या वतीने महिलांना पुष्पगुच्छ व मिठाई वाटुन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी गवळीवाडा भागातील बहुसंख्य मुस्लिम महिला भगिनी उपस्थित होत्या.

16

4