पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार मुले गंभीर…

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

चिंदर तेरई, लब्देवाडीतील घटना…

आचरा, ता. ३ : आचरा परीसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास पुन्हा एकदा सुरू झाला असून चिंदर लब्देवाडी, तेरई येथे अंगणात खेळणाऱ्या छोट्या चार मुलांचा कुत्र्याने चावा घेऊन, ओरबाडून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथे दाखल करण्यात आले तर एका मुलीला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली.
आचरा त्रिंबक भागात जून महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे माणसांना, जनावरांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडल्या होत्या. मध्यंतरीच्या कालावधीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास कमी झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला असतानाच पुन्हा एकदा चिंदर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अंगणात खेळत असलेल्या छोट्या मुलांना लक्ष केल्याने भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंदर तेरई येथील डिंपल यशवंत घागरे (वय- ८), भावेश सदानंद घागरे (वय-११) हि मुले आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. तर सकाळी चिंदर लब्देवाडी येथील दर्शित विश्वंभर चेंदवणकर (वय- ५), नियती विश्वंभर चेंदवणकर (वय- ३) यांना ही चावा घेऊन आणि ओरबाडून जखमी केले. जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे उपचारासाठी दाखल करून अधिक उपचारासाठी ओरोस येथे नेण्यात आले. यातील डिंपल घागरे हिला त्रास जास्त जाणवू लागल्याने उपचारासाठी तातडीने मुंबईला नेण्यात आल्याचे समजते.

\