2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी.ता,३: आरोंदा किरणपाणी खाडी पात्रात मानसीवाडी भागात अज्ञात पुरूष जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. हा प्रकार आज सकाळी ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे उघड झाला.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व पोलिस प्रयत्न करत आहेत. नेमका तो मृतदेह कोणाचा आहे. याबाबत माहिती मिळू शकली नाही. भरती असल्यामुळे खाडीत मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे मदत कार्य करण्यास अडचणी येत आहेत. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती पोलीस हवालदार विजय केरकर यांनी दिली.याबाबत पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत कोणताही नोंद करण्यात आली नाही. संबंधित व्यक्ती कोण याची माहिती मिळाल्यानंतर पुढील तपास लावणे शक्य होणार आहे. त्या व्यक्तीने आत्महत्या केली. कसे काय याबाबत अद्याप पर्यंत काहीच समजू शकत नाही. असे केरकर यांनी सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4