कणकवलीत महामार्ग अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

2

कणकवली, ता. 3 : कणकवली शहरात महामार्ग दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवण्याची कारवाई आज राष्ट्रीय महामार्गावर विभागातर्फे सुरू करण्यात आली.दुपारी बारा वाजल्यापासून शहरातील बस स्टँड ते पटवर्धन चौक या परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे. या कारवाई वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याखेरीज महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, शाखा अभियंता गणेश महाजन उपस्थित आहेत.

2

4