असनिये.ता,३: येथील गिरीजाबाई महादेव सावंत वय ८५ या वृद्धेचा मृतदेह शनिवारी सकाळी ओठवणे नदीपात्रात आढळून आला.
असनिये गावठाणवाडी येथिल गिरीजाबाई सावंत ही वृद्ध महिला गुरुवारपासून बेपत्ता होती.गुरुवारी गिरिजा हि आपल्या माहेरी विलवडे येथे जाते असे सांगुन निघाली होती. पण विलवडे येथे न आल्याने नातेवाईकांनी शोधा शोध करुन सापडली नाही. शुक्रवार सांयकाळी उशिरा हरवल्या असल्याची तक्रार शशिकांत महादेव सावंत यांनी बांदा पोलिसांत दिली होती. शुक्रवारी सायंकाळी आंबोली-बांदा मार्गावरून जाणाऱ्या काही वाहन चालकांनी एक महिला सरमळे पुलाखालील नदीतून वाहून जात असल्याचे पाहिले होते. दरम्यान, सरमळे पुलावर गिरीजा हिचे चप्पल,जेष्ठ नागरीक ओळखपत्र व इतर वस्तू सापडल्या होत्या.त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.मात्र शुक्रवारी पोलिसांनी सर्वत्र पाहणी केली मात्र काहीच सापडले नाही.
शनिवारी सकाळपासून पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहिम राबविली.दरम्यान, ओटवणे नदीपात्रातील झुडपात तिचा मृतदेह आढळून आला.
ओटवणे नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES