साळ पुनर्वसन रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी…

144
2

दोडामार्ग.ता,३:
साळ पुनर्वसन येथे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या जोड रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता केला जाईल. असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले.
हा रस्ता होण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गेली. अनेक वर्षे प्रयत्न केले होते. दरम्यान मयेचे आमदार प्रवीण झाटये यांनी पावसाळी अधिवेशनात या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी लवकरात लवकर रस्ता केला जाईल. असे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान मानले जात आहे.

4