माडखोल येथील माजी सैनिकाचे घरफोडून ६२ हजारांचा मुद्देमाल लंपास…

2

नमसवाडीतील घटना;पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…

सावंतवाडी ता.०३: ओटवणे येथील घरफोडीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा माडखोल येथील माजी सैनिक गंगाराम भरत राऊळ (७७) रा.नमसवाडी याचे घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून एकूण ६२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.दरम्यान राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,राऊळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने ही चोरी २ ऑगस्ट रात्री ते आज रात्री उशिरा केली असावी असा अंदाज आहे.तर घराच्या शेजारी असलेली काचेची खिडकी तोडून चोरट्याने आत प्रवेश करत ही चोरी केली असे त्यात म्हटले आहे.यात ५ ग्रॅम सोन्याच्या ३ अंगठ्या,३ ग्रॅमची १ अंगठी,२ ग्रॅमची १ नाकातील नथ,४ ग्रॅम च्या कानातील साखळ्या,५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व १२ हजार रुपयांची रोकड मिळून एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांच्या हाती लागला आहे.याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.याबाबतची माहिती ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांनी दिली.

4