….अन्यथा रास्तारोको करु

187
2

बाबू सावंत यांचा पंचायत समिती बैठकीत अधिकाऱ्यांना इशारा

सावंतवाडी.ता,३:जुन्या झाराप पत्रादेवी महामार्गाला पावसाळ्यापूर्वी कामे करून सुद्धा खड्डे पडले आहेत.हे खड्डे चार दिवसात भरा अन्यथा माजगावात रास्ता रोको करू असा इशारा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य बाबू सावंत यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिला.गणेशोत्सव जवळ येत आहे त्यामुळे या मार्गावरील झाडी सुद्धा साफ केली पाहिजे.आज सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तालुका कृषी विभागाचे अधिकारी मिटींगाना हजर राहत नाहीत.आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे ? लोकांना के उत्तरे द्यायची.योजना येतात त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत.मग योजनेचा उपयोग काय ? मिटींगला हजर न राहणे हा सभागृहाचा अपमान आहे.याची लाज वाटत नाही का? असा सवाल यावेळी बाबू सावंत यांनी केला.तर सावंतवाडी तालुक्यातील पालकमंत्री रहिवाशी आहेत मात्र या तालुक्याला पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी मिळत नाहीत हे दुर्दैव आहे असे सदस्य संदीप गावडे यांनी सांगितले.

4