एम.के.गावडे : वेंगुर्लेत भजन स्पर्धेला प्रारंभ
वेंगुर्ले,ता.३ संगणक युग असताना सुद्धा महाराष्ट्रात संत परंपरा जपली जाते.त्यामळे गुन्ह्याचे प्रमाण कमी आहे.कलियुगात यशस्वी होण्यासाठी नामस्मरण गरजेचे आहे.भजनाने नामस्मरण व समाजप्रबोधन होते. भजनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सरकारने या कलेचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एम.के. गावडे यांनी वेंगुर्लेत भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
संसदरत्न खासदार सुप्रीया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आणि अर्चना फाऊंडेशन आयोजित भव्य भजन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचा शुभारंभ श्री. गावडे यांच्या हस्ते आज शनिवारी ३ ऑगस्ट रोजी श्री रामेश्वर मंदिर, वेंगुर्ले येथे दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी अर्चना घारे- परब, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, देेेवस्थान मानकरी सुुनिल परब, आधार फाउंडेशन चे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, उद्योजक संदीप घारे, संदीप पेडणेकर, धर्माजी बागकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, योगेश कुबल, सुभाष तांडेल, डॉ संजीव लिंगवत, मकरंद परब, निलेश मेस्त्री, सरोज परब, विनय परब, वनिता मांजरेकर, सुहास राणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना एम. के. गावडे म्हणाले की,सरकारने दशावतारी कले बरोबरच भजन कलेचा सन्मान करून नवकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून द्यावे. अर्चना घारे- परब यांची कोकणाशी नाळ घट्ट असल्याने त्यांचे हे सामाजिक कार्य महत्वपूर्ण सल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान प्रास्ताविकात अर्चना फाउंडेशन च्या अध्यक्षा अर्चना घारे- परब यांनी आत्ताची तरुण पिढी सुसंस्कृत असल्याने ठिकठिकाणी नवोदित भजनी कलाकार निदर्शनास येतात. यामुळे या भजनी कलाकारांना हक्काचे मोठे व्यासपीठ मिळावे तसेच भजनाने समाज प्रबोधन होऊन त्या बरोबरच आरोग्य निरोगी राहते या सर्व उद्देशाने या भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तर नम्रता कुबल यांनी भजनाने साधकावर भक्तीचा आविष्कार होतो, मनावर चांगले संस्कार होतात.भजनांच्या अशा स्पर्धेने तुलना होते व भजन अधिक समृद्ध होते असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गवस यांनी तर आभार प्रदर्शन डॉ संजीव लिंगवत यांनी केले. या भजन स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोहन मेस्त्री व कृष्णा राऊळ यांनी तर ध्वनी संकलन सुभाष शिरोडकर यांनी केले.