परुळेत ८ ऑगस्ट पासून पारायण निरूपण व राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

2

वेंगुर्ले.ता,३: परुळे येथील श्री देव आदिनारायण देवस्थान यांच्या वतीने पवित्र श्रावण मासा निमित्ताने ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०१९ या कालावधीत आदिनारायण मंदिर येथे ग्रंथराज दासबोध या वर पारायण निरूपण व राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत ग्रंथ राज दासबोध निरूपण व मनोबोध आत्माराम ग्रंथाचे पठण, दुपारी १ वा आरती व प्रसाद, सायंकाळी ४.३० ते ७ वा सुश्राव्य दासबोध निरूपण व्यासपीठ चालक व प्रवचनकार समर्थ भक्त भागवाताचार्य श्री सुरेशजी सोन्ना महाराज रामदासी सज्जनगड सन १९८३ पासून सज्जनगडावर समर्थ सेवा संपूर्ण भारत भर श्री रामकथा भागवत कथा यांचं निरूपण, रात्री ८ वाजता राष्ट्रीय कीर्तन महोत्सव होणार असून यामध्ये दिनांक ८ रोजी दत्तभक्त ह. भ. प. विवेक बुवा गोखले नृसिहवाडी विषय -मंगला चरण, दि. ९ रोजी ह. भ. प. विनोद बुवा खोंड नागपूर यांचं समर्थ भक्तियोग कीर्तन, ‘शनिवार १० रोजी विलासबुवा गरवारे सातारा यांचं दासबोध सदभा, रविवार ११रोजी सुप्रसिद्ध महिला राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. सौ रोहिणीताई माने परांजपे मुंबई विषय नरदेह स्तवन निरूपण तर दि. १२ रोजी ह. भ. प. राघवेंद्र बुवा देशपांडे रामदासी लातूर विषय- दासबोध फलश्रुती हे कीर्तन या महोत्सवात सादर होणार आहे. यासाठी संगीत साथ हार्मोनियम अमित मेस्त्री नेरूर, तबला प्रसाद मेस्त्री नेरूर, मूदूंग आनंद मोर्ये हे करणार आहेत तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव आदिनारायण देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

4

4