Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीचा जामीन अर्ज फेटाळला...

पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीचा जामीन अर्ज फेटाळला…

सिंधुदुर्गनगरी ता.०३: पत्नीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुनकावळे येथील गोपाळ सुरेश देसाई  ३४ याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.बी. रोटे यानी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील स्वप्निल सावंत यानी काम पाहिले.
२६ जून २०१९रोजी मयत सौ काव्या गोपाळ देसाई २७ ही जेवण खाण आटोपल्या नंतर सासू सुचिता  आणि ५ महिन्यांची मुलगी आरोही यांच्या सोबत घराच्या वळइत झोपली होती. तर पति गोपाळ सासरे सुरेश व चुलत सासरे अनिल  हे अन्यत्र झोपले होते. दरम्यान २७ रोजी सकाळी काव्या चा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. शव विच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा गळा दाबला गेल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला होता. तर विसेरा मात्र राखून ठेवला होता.
याप्रकरणी दखल फिर्यादि नुसार पति गोपाळ सुरेश देसाई. सासरा सुरेश गोपाळ देसाई ६६. सासू सुचिता सुरेश देसाई. आणि चुलत सासरा अनिल गोपाळ देसाई. या चौघां विरुध्द भा. द. वि. कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गोपाळ याला २९ रोजी अटक झाली होती. ५ जुलै पर्यन्त च्या पोलिस कोठडी नंतर प्रथम वर्ग न्यायदण्डाधिकारी यानी न्यायलयीन कोठडी मंजूर झाली होती. अद्याप तो न्यायालयीन कोठडीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments