वेतोरे विद्यालयातील विद्यार्थी हस्तकलेत झाले मग्न…

294
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला, ता.३ :तालुक्यातील वेतोरे येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्री देवी सातेरी विद्यालय येथे विद्यार्थी हस्तकला विकास कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये नागपंचमीचे अवचित्य साधून विध्यार्थ्यांनी मातीचे नागोबा आणि वाती, वस्त्रे बनविली.
प्रत्येक कृती विचारांना जन्म देते, विचारांची ठिणगी पेटविते. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी त्यांच्या निरीक्षणातून त्यांना स्वनिर्मितीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्री देवी सातेरी हायस्कूल येथे हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्तकलेला वाव देण्यासाठी नागपंचमी सणाचे औचित्य साधून “नागोबा” तयार करण्याची नाविन्यपूर्ण कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ५ वि ते ७ वि च्या एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच त्यांना शिक्षक टी. एस. भोगण, निलेश पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इ.८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी वाती, वस्त्रे बनवून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला, त्यांना दीप्ती प्रभू, प्रवीणा पालव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या हस्तकला उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांस निश्चितच वाव मिळेल, असे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर यांनी सांगितले.