Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यायापुढील काळातही आम. वैभव नाईक यांना आमचा भक्कम पाठींबा...

यापुढील काळातही आम. वैभव नाईक यांना आमचा भक्कम पाठींबा…

माजी सभापती चंद्रकांत माधव यांनी दिला विश्वास ; तेंडोली विभागात जनसंवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ, ता. ३ : आमदार वैभव नाईक हे गेली पाच वर्षे जनसंपर्कातच आहेत. त्यांचा जनसंवाद पाच वर्षे सुरूच आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच गावातील विविध विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे यापुढील काळातही आमचा भक्कम पाठिंबा आमदार वैभव नाईक यांना देणार आहोत. गेल्या पंचवीस वर्षाच्या काळ पहाता एवढा दाट जनसंपर्क असलेला आमदार होणे नाही असे प्रतिपादन कुडाळचे माजी सभापती चंद्रकांत माधव यांनी आज तेंडोली विभागातील पाट येथे जनसंवाद अभियानात केले.
आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून कुडाळ-मालवण मतदार संघात राबविण्यात येत असलेले जनसंवाद अभियान आज तेंडोली मतदार संघात पोचले. या विभागात तेंडोली, पाट, वाडी वरवडे, बिबवणे, गोवेरी, माड्याचीवाडी, वरची आदोशीवाडी, तेंडोली कुंबणोसवाडी, चिकलनवाडी यासह अन्य भागात वाडीवाडीवर जात आमदार नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पाच वर्षात झालेल्या विविध विकासकामांची माहिती देत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. आजच्या तिसर्‍या दिवशीही या अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जि. प. सदस्या वर्षा कुडाळकर, पं. स. अनघा तेंडोलकर, पं. स. सुबोध माधव, तालुकाप्रमुख मथुरा राऊळ, विभागप्रमुख संदेश प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून तेंडोली विभागातील जनतेने आपल्यावर जो विश्‍वास दाखविला तो सार्थकी ठरविला आहे. अनेक विकासात्मक कामे या विभागात मार्गी लावण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्या माध्यमातून झालेल्या विकासाची माहिती कार्यकर्त्यांबरोबर सर्वसामान्यांनीही इतरांना द्यायला हवी. आपल्या मतभेद लोकांसमोर न मांडता एकदिलाने सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments