त्रुटी दूर करा ;शिक्षकांची पालकमंत्री केसरकरांकडे मागणी…
सावंतवाडी ता.०४: बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांवर सातवा वेतन आयोग देताना काही त्रुटी राहील्यामुळे अन्याय झाला आहे.त्यामुळे त्या त्रुटी दूर करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षकांच्यावतीने आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली.या समस्या सोडवण्यासाठी खास समिती स्थापन करण्यात यावी तसेच काही निकषात अपेक्षित बदल करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले.दरम्यान याबाबत लवकरच मुंबईत बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्री.केसरकर यांनी दिले.
यावेळी प्रवीण शेर्लेकर, संतोष वारंग, सुरेखा देसाई, मनाली आरोलकर, सुरेखा परब, विनोद मेथर, रुपेश परब, मनोहर परब, किरण मुळशी आदी उपस्थित होते.